निसर्गाचा समतोल साधून करावा विकास

कुठल्याही देशाचे उत्तम रस्ते  हे विकासाचे चाके म्हणून ओळखल्या जातात.
औद्योगिक मालाचे दळणवळण,पर्यटन,वेगवेगळ्या भागांची कनेक्टीविटी म्हणून रस्त्यांचे महत्व अबाधितच आहे.भारतासारख्या विकसनशील देशांमधे तर जेवढे रस्त्यांचे नेटवर्क  मजबूत तेवढा अंतर्गत विकास झपाट्याने घडवून आणता येतो.त्यामुळे रस्ते व्हायला पाहिजेतच.....
पण निसर्गाचा,जैवविविधतेचा,आणि पर्यायाने पर्यावणाचा ह्रास करून होणारे रस्ते हे विकासाचे माॕडेल होऊ शकत नाही.भग्न अन सिमेंटची जंगले शाश्वत विकासात येत नाहीत.त्यामुळे वृक्षतोडीचा असाच प्रयत्न खामगांव-शेगांव रस्ता चौपदरीकरणात होणार तर नाही ना?  अशी शंका मनात निर्माण झाल्यामुळे हा लेख प्रपंच...

काही वर्षापुर्वी खामगांव-जालना महामार्ग चौपदरीकरणासाठी शेकडो झाडांची कत्तल केल्या गेली. नाममात्र भावात झाडांचा लिलाव करून,दशकांची नैसर्गिक संसाधाने असलेली अमुल्य झाडे खिरापतीत वाटल्या सारखी विकून तोडली.
भरपाई म्हणून कुठल्याही प्रकारची झाडं कुठेच  लावल्या गेली नाही.
आणि निर्दयतेचा कळस म्हणावा की काय???त्याच जून्या रस्त्याच्या आजूबाजूला मोठंं खोदकाम करून,ते तसंच पेंडींग ठेवल्या गेलं.त्यात शेकडो निष्पाप लोकांचा अपघातामधे मधे बळी गेला......आजही 'रस्ता कमी खड्डे जास्त' अशी परीस्थिती त्या महामार्गाची आहे आहे. तो महामार्ग वाढला तर नाही,पण अगणित झाडे अन माणसांचा जीव घेऊन,होता त्यापेक्षा अधिक जिर्ण अन जिवघेणा झालांय.
त्याचीच सुधारीत आवृत्ती  खामगांव-शेगांव रोड चौपदरीकरणात होणार की काय?अशी भीती मनाला सतावतेय.....कित्येक दशकांची हिरवळ जेसीबीने उकरून तिथं भग्न डांबरी किंवा सिंमेंटचे रान उभं केल्या जाईल.अन संतानी सोयरीक केलेल्या वृक्षांचे अवशेष तेवढे फोटोत छापून 'वृक्षतोड करूनये' चा संदेश छापल्या जाईल.
श्रीं च्या भक्तांना पालखीत किंवा गुरूवारी पायी जातांना....विसाव्यासाठी आधार असलेली झाडे यापुढे तेथे दिसतील काय??
आधीच दुष्काळ त्यात ही वृक्षतोड शेतकर्यांना परवडेल का???
ह्या वृक्षतोडीचे परीणाम खामगांव-शेगांव च्या तापमानावरही होणार. त्यामुळे आधीच उकडविणार्या खामगावांत.....आणखी काय फ्राय होण्याची वाट बघणार काय?
असे अनेक प्रश्न मनाला अस्वस्थ करायला लागले आहेत.
त्यामुळे चौपदरीकरणातूनचा विकास शाश्वत ठरणार की निसर्गाचा जिवघेणा ठरणार असा प्रश्न उभा राहातो.

रस्ता बांधतांना वृक्ष आडवे येतात म्हणून रस्तेच बांधायचे नाही किंवा विकासकामेच होऊ द्यायची नाहीत,हे योग्य नाही. निसर्गाचा समतोल साधूनही हा विकास योग्य प्रकारे साधता येईल.त्यासाठी खालील उपायाचा विचार संबंधितांनी करावा...

1)सध्या रस्त्याचे निरीक्षण केल्यास तोडल्या जाणारी झाडे  चौपदरीकरणाच्या थेट मधे  येतात.त्यामुळे रस्ता  दुभाजका मधे लावण्यात येणार्या नव्या झाडांऐवजी, सदर  जूनीच झाडे त्यांच्या फांदी तोडून  ठेवल्यास उत्तम होईल.अथवा...

2)रिप्लांटेशन(पुनर्रोपण).
60 वर्ष जुने  वडाचे झाड कर्नाटक मधे पावसामुळे मुळासकट उपसले गेले होते. तो वड मनिपाल इंस्टीट्यूट आॕफ टेक्नोलोजी येथे यशस्वीपणे पुनर्रोपीत केल्या गेला.
मध्यंतरी ओडीसामधे रेल्वे प्रोजेक्टसाठी आड येणार्या 100 झाडांचे यशस्वीपणे  पुनर्रोपन करण्यात आले.
सुरत,गुजरात मधे 5000 च्या वर वृक्षांचे  पुनर्रोपन केले गेले.
गुजरातने तर पुनर्रोपनाची मशिनच U.S.A कडून विकत घेतली. अशे व अनेक पुनर्रोपणाची उदाहरणे महाराष्ट्रासहीत देशभर मिळतील.
असाच Replantation चा प्रयोग खामगांव शेगांव मार्गावरील झाडांवर करता येईल.जेणेकरून रस्ता चौपदरीकरण ही होईल अन वृक्ष ही वाचतील.
Replantation(पुनर्रोपण) म्हणजे नेमके काय ..?
पुनर्रोपण म्हणजे वृक्षतोड करण्याऐवजी ,त्याच वृक्षांचे पुनर्रोपण दुसर्या ठिकाणी यशस्वीरीत्या करणे.
Botanical survey of India, चे माजी शास्त्रज्ञ डाॕ. दुलाल चंद्र पाल यांनी एक इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत" पुनर्रोपण हे पर्यावरणासाठी तारक आहे.त्यामुळे वृक्षतोडीमुळे होणारे नुकसान 80% भरून काढता येईल" असे मत व्यक्त केले होते. आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या नुकसानीपुढे पुनर्रोपणाचा खर्च ही नाममात्र ठरतो अन समतोलही साधता येतो.

मुळातच एकीकडे आपण 'कोटी वृक्ष लागवडीची' जाहीरात 'लाखो रूपये' खर्च करून करतोय,ती किती जगातात? किती मरतात? हा संशोधनाचा विषय आहे.पण पुर्वजांच्या पुण्याईने मोफत मिळविलेले उंच वृक्ष जगविने आपले तसेच सरकारचे नैतिक कर्तव्य आहे. त्यात जर सरकार चुकत असेल तर अशा वेळी सुज्ञ नागरीकांनी सर्व बाजूंचा सर्वांगिण विचार  करून,आपल्या सुज्ञपणाचे कर्तव्य वृक्ष वाचविण्यासाठी बजवावे.
सरकारचा नैतिक नसला तरी हरीत लवादाचा कायदेशीर आधार आपल्या पाठीशी आहेच.
प्रश्न फक्त आपल्या जागृत विवेकाचा आहे...

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।
         संत तुकाराम महाराज.

:-सौरभ गोपाळ हटकर
हिवरखेड ता.खामगांव
जि बुलढाणा..9604079143

Comments

  1. Its real fact . Concept of replantation should be used. Many people just highlights the problems but nobody suggest solution. This article underlines problem with appropriate solution of it....

    ReplyDelete
  2. बरोबर आहे भाऊ विकास तर झाला पाहिजे पण वृक्ष तोड करून नाहि अशा विकासाला काही महत्व राहणार नाही

    ReplyDelete
  3. thank u dear friends for your valuable comments and view......

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

प्रवास अभियंता दिन to 'दीन' अभियंता-एक विश्लेषण .

06 Dec...