---जनरल डबा~1---

         दि.15/10/2017

दुपारी 12 ला पेपर संपवून नवी मुंबई पासून कल्याणचा 'लोकल' प्रवास करण्यात 'ग्लोबल' मजा आली.
तो प्रवास कदाचित संस्मरणीय ठरण्यासाठीच आसावा.कारण........©

दुपारचा एक वाजला होता,घामाने तरर होतो. प्रवासा बद्धलचा विचार करून क्षीण मनाने कल्याण पासून जळगाव  साठी पवन ट्रेन च्या जनरल डब्यात घुसलो.
खरंतर तो नुसताच जनरल डबा नसतोच , तो असतो खरा जनरल भारत.
दुःखी,सुखी,कष्टी,पाकीटात तिकीटा ऐवढेच पैसे असणारे पण डोळ्यात जग जिंकण्याचा ध्यास ठेऊन मिळालेल्या जागेत(संधीत)Adjust होणारे,तर काही भनसेवादी(बाहेरसे आते है साले,यहाँ गंदगी फैलाते,सिट तुमारे बाप की है?,हमे सिट मिलनी चाहे वगैरे) व ई.

दरवाजाच्या मुखाच्या अर्धे आत अर्धे बाहेर असलेला हा वर्ग दुःखी असतो,आपल्याला  संडास जवळ किंवा संडास मधेतरी प्रवास संपेपर्यंत उदरनिर्वाहा पुरती जागा मिळावी.ऐवढी माफक अपेक्षा त्या वर्गाची असतात.
अन नाही मिळाली तरी , आपल्या नशिबात दरवाजाच आहे असं म्हणून सहनारे.

दुसरा वर्ग दरवाज्याच्या आत सुरक्षित पण ताटकळत उभे असलेला कष्टी असतो.
सकाळी सकाळी तोंडावर येणारी 'अर्जंट' प्रतिक्रिया यांच्या तोंडावर उमटवंत ताटकळलेल्या पायाला मोकळं करण्यासाठी एखादी *सिट* भेटांवी,ही ह्यांची मध्यमवर्गीय अपेक्षा .
हा वर्ग बर्यापैकी असंतुष्ट असतो अन आपल्या परीस्थितीला तिसरा वर्गाला कारणीभूत ठरवत असतो.

तर शेवटी एक  चैनी विलासी वर्ग  सिटांवर आपलं निर्विवाद अधिपत्य पहिल्या स्टेशन पासून गाजवत असतो . ही लोकं मुख्यतः बाहेरील असतात.अन ती सुरूवातीपासून आपलं वर्चस्व जागांवर निर्माण करून निवांत प्रवास करीत असतात .  त्यांना ना दरवाज्यातील लोकांची पर्वा असते ना उभे असलेल्यांची. आपलं luggage पासून तर मोकळ्या झोपण्यापर्यंतच्या जागा ह्यांचे नेटवर्क  ते स्व ते सहसंबंधीतांसाठी वर्क करवत असताता.

अशावेळी एखादा 'आशावादी' परमात्मा 'उभे' असलेल्या मधून जन्म घेतो,अन उभे असलेल्यांना अच्छे प्रवासाची  के लिए 'संताप' व्यक्त करून सिट मिळविण्यासाठी आंदोलन छेडतो.
एक दोघांना शिव्या घालतो, उभ्या असलेल्यांचा सक्रिय पाठिंबा मिळवितो.
अशावेळी हुशार चैनी भैयालोक त्याला अन त्याच्या सहकार्याला अॕडजष्ट करून आवाज चूप करतात.
वातावरण शांत होतं,स्टेशन बदलतं काही उतरतात तर काही नविनची भर्ती दरवाज्यात होते. दरवाज्यातील काही आत येतात. आत आलेले पुन्हा असंतोष व्यक्त करायला लागतात.पुन्हा अॕडजष्ट होतात.

असा उठाव अन Adjust  ची प्रक्रिया कालांतराने (स्टेशन बदलंले की) घडतंच असतात.

पण 'सिटे क्या ईनकी बाप की है?' हा काॕमन नारा वेगवेगळ्या पद्धतीने उभं असतांना मिरवणारे सिट वर बसताच चिपकून जातात.
खरी गोम तर येथे आहे की,जेव्हा ते एल्गार करून सिट वर बसतात,तेव्हाच त्यांना सिट अपनेच बाप की है अन  अब क्या मेरे सिर पर बैठेगा,जगह ही नही तो क्या करे?,सरकार ने  बोगी बडानी चाहीए असे डाॕयलाॕग मारून,आपल्याला सिट साठी adjust करायची वेळ येऊ नये म्हणून तो वेळ मारून नेत असतो.

अशावेळी उभे असलेले पिचले जातात तर दरवाज्यातील बहुतांश खंगतात काही तरतात काही मरतात.

या सर्व प्रवासात मला फेरीवाले ग्रेट वाटतांत.डब्यातून कितीही विरोध झाला तरी  ते 'भाई मुझे रूखना थोडी न है' असं म्हणत,गच्च गर्दीतून वाट काढत आपलं product विकून जातात.
खरंतर ते  कुठल्याही विद्यापिठातील M.B.A ची डिग्री न घेता खरे management and marketing गुरू असतात . कारण त्यांना  लोकांना काय हवंय हे ओळखून परीस्थितीला अनुरूप वागता येतं, म्हणून ते मला तेथे  विजेते वाटतात.

हा सगळा प्रवास पुन्हा वाचल्यास  जनरल डब्यामधे आपल्या आजूबाजूचा जनरल भारतच दिसतो.फरक एवढाच की  डब्याच्या दरवाज्याशी उभे असलेले 'मोजके',जनरल भारतात उदरनिर्वाहासाठी तडफडतांना 'मोठ्या' प्रमाणात दिसतात.
अन दुर्दैव एवढे की 'उभे' असलेल्यांमधलं नेतृत्व सातत्याने त्यांचा फायदा घेऊन स्वतःची सिट अॕडजष्ट करतात.
त्यांचा वाली 'उभा' असलेल्यांमधून होऊच शकत नाही. परंतू त्यांना जर भारतात त्यांच्यासाठी हक्काच सिट हवं असेल,तर निर्माण करावे लागेल एखादे भिमराव किंवा ज्योतिबा ......
जिंदगी नावाचे स्टेशन सुख अन सन्मानाने पार करण्यासाठी......

(मला लिहायचं काही वेगळंच होत,पण लिहीता लिहीता सुचलं वेगळं काहीच....असो वरील © पासून शक्य झाल्यास जे लिहायचे होते ते लिहील.)

             सौरभ हटकर
       खामगांव9604079143
                              ™भटका

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

06 Dec...

म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .