स्वतःच्या जातीबद्धल पहिल्यांदाच post करतोय....

स्वतःच्या जातीबद्धल पहिल्यांदाच post करतोय....(जत प्रकरणाबद्धल)
खरंतर जातीचा माज असणे वगैरे,किंवा ईतिहासात उत्तुंग कार्य केलेल्या एखाद्या महापुरूषाच्या जातीत योगायोगाने जन्म होऊन,
स्वतःचं कार्य शुन्य असतांना त्या महामानवाच्या उत्तुंग कार्याच्या नावावर स्वतः वृथा शौर्याच्या उड्या मारणं.
हे काही मणाला पटत नाही, कधी पटलंही नव्हतं.....
त्यामुळे कट्टर जातीवादात कधीच रमलो नाही.....
पण जत मधील धनगरांचा उद्धार करणार्या महिलेचा video पाहिला.....
अन मग संताप आला.....संताप याबद्धल नाही की प्रश्न माझ्या जातीचा आहे,तर याबद्दल की तो प्रश्न तथाकथित उच्चवर्णिय मानसिकतेचा आहे......
जिथे धनगरांना येड ठरविल्या जातं.....
किंवा वर्णव्यवस्थेने निम्न स्थान दिलेल्या त्या प्रत्येक समुहास 'निच' ठरवण्यासाठी निर्माण केलेली प्रतिकं जाणिवपुर्वक वापरून उच्च निचता जोपासल्या जाते....
खरंतर
ती महिला सामान्य आहे ,त्यांच्या बद्धल काही आकस पण नाही....
पण जी लोकं जातीव्यवस्थेचा कणा मोडण्याचा आव आणुन, तथाकथित पुरोगामित्वाचा ताव मारतात.
स्वतःला वैचारीक प्रगल्भ म्हणवून घेतात,
ती माणसं सुद्धा खाजगीत अशाच बाता मारताना जेव्हा दिसतात.,तेव्हा खरं दुःख होतं.
कारण कधीकाळी त्यांच्याच पोष्ट,विचार,भाषणं ऐकुन जातीयवाद गळून पडलेला असतो....
आणि मग पुरोगामि मुखवट्या आडचा त्यांचा भेसूर तो जातीयवादी चेहरा पाहिल्यावर मग मात्र संतापाचा कडेलोट होतो....
बाबासाहेबांच महानपण यासाठीच येथे वाटतं, की त्यांना माहिती होतं....2000 वर्षांची पेरलेली घाण विषमतेची विचारसरणी ईतक्या सहजतेने समाजाला समता स्विकारू देणार नाही.
म्हणून धर्मांतरणाची क्रांती त्यांनी घडवून आणली होती....
आज आपण आधुनिकवादाच्या युगात असतांना,
आपण सगळ्यांनीच असली वैचारीक घाण डोक्यातून काढून टाकायला हवी.......
कारण आज प्रत्येक समाज-समुह जागृत होत आहे,त्याच्या हक्काला जागतोय.
त्यामुळे त्यालाही त्याच्याविरूद्धच्या सामाजिक,राजकीय ,आर्थिक,वैचारीक आणि तत्सम अन्यायाची जाणिव होत आहे.म्हणून ही मध्ययुगीन मानसिकतेची 'झुंबरं' आपल्या सर्वांना फेकाविच लागतील....
नाहीतर आपला प्रवास मध्य,प्राचिन युगाच्या विषम समाजव्यवस्थेकडे झाल्याखेरीज राहणार नाही....
अन मग तो अनारकी माजवणारा असेल........
कारण आज प्रत्येक समाज त्याच्या परीने लढायला शिकलेला आहे,प्रत्येक वेळेस तो सहन करेलच असे नाही....
बाकी त्या परीचारक नामक आमदाराचा सैनिकांबाबत काढलेल्या वक्तव्याबद्धल आणि जत मधील त्या महिलेचा धनगर समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचा तिव्र निषेध.........
(निवडणुक आयोगाने दोघांवरही कारवाई करावी)
सौरभ हटकर
खामगाव
9604079143

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

06 Dec...

म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .