आपण ठरवून घेत असतो ना जगण्याच्या चौकटी.....?
आपण ठरवून घेत असतो ना जगण्याच्या चौकटी ....?
आज जरा करमत नव्हतं....म्हणजे हा न करमण्याचा प्रोग्राम बरेच दिवस झालाय ,असाच चालू आहे.....
त्यामुळे ना कुणाशी बोलावसं वाटत न कुणी जवळच वाटत
.....काही लिहावसं वाटत नाही....कुठं फिरावसं वाटत नाही.....(बाकी ते प्रेम,प्रेयसी हे विषय त आपल्या आयुष्याचा भागच नाहीत).....

सतत एकटेपणाची जाणिव मनाला खचवत असते......
अशा वेळी आजूबाजूच्या वातावरणाचा आणि चालू घडामोडीचा श्येड्यूल सुद्धा ठीक पचवल्या जात नाही .....पण मग थोडं चिंतन केलं ,की मनातले कच्चे पक्के दुवे कळायला लागतात.........आणि समजायला लागतं...की अरे आपल्या एकटेपणाची जाणिव आपणच ठरवून निर्माण केलेली असते......आपण ठरवून टाकलेली असते चौकट....की हे असेच होनार किंवा मी हे करूच शकणार नाही...
नव्हे आपण ठरवलेली असते एखादी व्यक्ती,गोष्ट,वस्तु.आपल्या अनमोल जिवनाचा अविभाज्य भाग म्हणून......
किंवा ठरलेल्या असतात आपल्या बसायच्या,झोपायच्या जागा,class/office चे तेच रस्ते तेच routine....
ईतकेच नव्हे तर ठरवलेल्या असतात आपण आपल्या स्वतःच्या सवयी,विचार,पद्धतींच्या चौकटी,ice cream flavour पासून तर भाजी,चहाचे दुकान,subject आणि बरंच काही
...आपण ठरवून टाकलेलं असतं..अन त्या चौकटी बाहेर पडायला आपण तयारच नसतो...
नसतो तयार आपण नविन मोकळा श्वास घेण्यासाठी...अन असतो गुदमरत जागच्या जागी त्या चौकटीत....

आपण नुसत्या ठरवत नसतो चौकटी,तर करतो त्यांना दणकट,मजबूत 'तथ्थ्य' नसलेल्या तत्वांचे किंवा professional नावाच्या औपचारीकतेचे लेबल लाऊन ...
सुरूवातीला ती लेबल सौंदर्याची प्रतिकं असतात पण,
नंतर तीच प्रतिक रूळून रूळून गळफास ठरू लागतात.....
अशावेळी प्रत्येक जण त्या गळफासाच्या चौकटीला ऊद्ध्वस्त करण्याची पात्रता ठेवत असतो ,पण धाडस????
किंवा त्याच चौकटीला चिकटलेलं त्याचं मन तसं करण्यास धजावत नाही.....
पण काही मानसं ,काही व्यक्तीमत्व असतात.....
जी जगतात मुक्त तोडून सार्या चौकटी....मानवाच्या मुक्तीसाठी,कल्याणासाठी....
अन त्यांनाच महत्वकांक्षी म्हटल्या जातं...मग ते धर्मव्यवस्थेची चौकट मोडणारे तथागत गौतम बुद्ध ,समाज व्यवस्थेची चौकट आडवी करून स्वराज्य उभे करणारे शिवराय,अहिंसेसाठी
प्रसंगी स्वतःच्या विरोधात बंड करण्याचे धारीष्ट दाखविणारे गांधीजी.....
किंवा 'मनु' च्या विरोधात 'माणुसकी' साठी लढणारे बाबासाहेब असोत......
यांनी दाखविली होती महत्वकांक्षा व्यवस्था बदलावयाची, आणि त्यांनी ती घडवून सुद्धा आणली .
म्हणून ते जेते ठरतात,महान ठरतात......
स्वतःच्या आयुष्यातच नव्हे तर काळाच्या पटलावर सुद्धा.....

आपणही तोडू शकतो हे सगळं....फक्त जर आपल्याला गळफास ठरू वाटणार्या सवयी,व्यक्ती ,गोष्टी,परीस्थिती, स्वभाव यापैकी काहीही जरी बदलावयला ठरवलं तर समाजाच सोडा स्वतःमध्ये मात्र अतुलनिय परीवर्तन घडवून आणू शकू.....अन तेच खरं समाजकार्य ठरतं...,
तेच आपल्याला आनंद देतं....
चौकट तोडण्याची ताकद प्रत्येकात आहे....प्रत्यक्षात धाडस करण्यासाठी मात्र काळीज महत्वकांक्षीच लागतं.......

:-सौरभ हटकर....
खामगाव जि बुलढाणा9604079143
♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️
hatkar.saurabh@gmail.com
♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️
खामगाव जि बुलढाणा9604079143
♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️
hatkar.saurabh@gmail.com
♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️♐️
Comments
Post a Comment