लोककल्याणव्रत राजमाता:-अहिल्याराणी होळकर
"लोककल्याणव्रत राजमाता:-अहिल्याराणी होळकर"
परवा परवाला एक मुलगी two-wheeler बुलेट वर जाताना दिसली। तेव्हा आजुबाजुचे बहुतेक लोक तिच्याकडे बर्याच कुतुहुलाने बघाया लागले।
आणि तेव्हाच मनामध्ये विचार शिनशिनला कि आजच्या आधुनिक 21व्या शतकात जर एका महिलेला गाडी चालवताना पाहुन समाजास कुतुहुल वाटते तर 250वर्ष्या पुर्वी घोड्यावर स्वार होऊन,
हाती तलवार घेऊन,
रणांगणावर जाऊन,
निधड्या छातीने,
शत्रुच्या चिंधड्या ऊडविण्यासाठी रणमैदानावर झुंजणार्या त्या रणरागिणी लोकमाता,राजमाता अहिल्याराणीची काय शौर्यशाली कैफियत असेल..?
खरेतर 'चुल आणि मुल' या महिलांच्या प्रतिगामि व्याख्येला शह देऊन,
स्वबळावर,स्वकर्तृत्वावर स्वराज्य मिळविण्याचे कार्य आपल्या कतृत्वातुन घडवुन जगासमोर 'स्त्री' या शब्दाची व्याख्याच बदलवुन टाकणार्या तसेच जिजाऊंच्या प्रेरणेने,मल्हार रावांच्या मार्गदर्शनाने,व खंडोजीरावांच्या प्रेमाच्या जडणघडणीतुन घडलेले क्रांतीकारी स्त्रीरत्न तथा 17 व्या शतकातील महान व्यक्तिमत्व लोकमाता अहिल्याराणी होळकर यांची आज जयंती।
31मे 1725 साली माणकोजी-सौ.सुशिलाबाईंच्या पोटी जन्मास आलेल हे धगधगत क्रांती रत्न म्हणजेच अहिल्याराणी होळकर।
आचार्य वेरूळकर गुरूजी नेहमी सांगतात"संस्कारे घडीतो माणुस" तथा तुकाराम महाराजही संस्काराचे महत्व सांगताना "शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी "सांगुन संस्काराचे महत्व स्पष्ट करतात।
असेच जाज्वल्य संस्कार अहिल्याराणीना बालपणातच मिळाले।
ज्या वयात मुली 'बाहुली-बाहुली',भुला बाई खेळणे पसंद करतात, त्या वयात घोड्यावर बसुन रपेट मारणे,तिरंदाजी करणे,तलवार चालविणे या सार्या गोष्टी अहिल्याराणीस प्रिय होत्या।
अशा युद्धनितीचा प्रभाव बालपणीच अहिल्याराणींच्या मणावर पडला।
त्यातच त्यांच्या मातोश्री सुशिलाबाई ह्या धार्मिक असल्यामुळे अहिल्याराणींना मानपान,सन्मान देणे,कार्यनिष्ठा,संयमि वृत्ती,सोज्वळता तथा निर्मळता हे अंगवळणीच पडले होते।
अशा दुहेरी संस्कारांच्या गर्तेत अहिल्याराणी घडल्या होत्या।
असेच एकदिवस मर्हाठ्यांचे विश्वासु व लढवय्ये शुरसरदार मल्हार राव होळकर व बाजीराव पेशवे वेशपालटुन फिरस्ती वर असताना अहिल्याराणीशी त्यांची गाठ पडली।
पहिल्याच नजरेत त्या कोवळ्या अहिल्येने त्यांना जरब देऊन तुम्ही व्यापार्याच्या सोंग घेऊन आलेले सोंगी असुन मल्हार रावांचे खरे रूप ओळखले। तसेच मल्हाररावांनी अहिल्येस तिरंदाजी करून समोरील झाडावरचा पक्षी मारण्यासाठी सांगितला।
तेव्हा अहिल्याराणी ऊद्गरल्या"आम्ही कोण्या मुक्या प्राण्यावर व गरिबांवर हल्ला करून आमची शुरता सिद्ध करत नाही आणि पक्षी तर आमचे पाहुनेच मग त्यांचा तर सन्मान करायला आमच्या मातोश्रींनी शिकविले,संहार नाही"
त्या प्रसंगाने मल्हारराव अचंबित झाले आणि अशी शुरकन्या जर आपली सुन जाहली तर .?या विचाराने मनोमण सुखावले।
सन1733 साली अहिल्याराणीचा विवाह मराठ्यांचे शुरसरदार मल्हारराव-गौतमाबाई होळकर यांचे एकुलते पुत्र खंडोजीराव होळकर यांच्याशी पार पडला।
खंडोजीरावांचे लक्ष राजकारभारात लागत नसे,व्यसनांच्या अतिआहारी गेल्यामुळे खंडोजीराव राजकारभारात लक्ष देत नसत।
परिणामी मल्हाररावांना खंडोजींच्या वागण्याने दुःखही व्हायचे।
पण त्यांची सुन अहिल्याराणींच्या कर्तृत्वावर त्यांचा ठाम विश्वास होता।मल्हारराव नेहमीच स्वार्यावर असल्यामुळे,राज्यकारभाराकडे बरच दुर्लक्ष होत असे।
अशावेळी अहिल्याराणींची कर्तृव्यनिष्ठा,चपळता,चाणाक्ष,चतुरता या सर्व गोष्टी जाणुन अहिल्याराणी कडे संपुर्ण राजकारभार सोपविला।
आणि मल्हाररावांचा विश्वास सार्थ ठरवितांना अहिल्याराणीने आपल्या पारदर्शी कार्यामुळे आपली सर्वत्र छाप ऊमटवुन।
"महिला ह्या आदर्श प्रशासक असतात" हे ऊदाहरण जगासमोर ठेवले।
*संयमी,सुजाण,पुरोगामि अहिल्याराणी होळकर*
माहेरचे संस्कार व सासरचे व्यवहारी ज्ञान यांची योग्य सांगड घालुन अहिल्याराणी शुरतेचे आयुष्य जगत होत्या पण काळाला ते पाहवल गेल नाही
आणि मग एका लढाईत1754 साली खंडोजीरावांना रणांगणावर विरमरण आले.
अहिल्याराणींना वयाच्या 29व्या वर्षी वैधव्य आले.
अहिल्याराणी मानसिक रित्या खचल्या व सती जाण्याच विचार करायला ,तेव्हा मल्हाररावांनी सती प्रथा लाथडण्यासाठी "बाळ तु राहिलीस तर,अहिल्या मेली खंडु आहे असे समजेल" हे ऊद्गार काडुन अहिल्येस सती जाण्यापासुन परावर्तीत केले।मग अहिल्याराणीने येथील 'तथाकथित ऊच्चवर्णीयांनी' लादलेल्या कर्मठ प्रथेविरूद्ध 'बंड' करून 'पुरोगामित्वाची' सनसनित 'चपराक' लगाविली।अशीच चपराक मासाहेब जिजाऊंनी रयतेच्या प्रेमापोटी शहाजीराजेंच्या विरमरणानंतर अवलंबली होती।
पुढे अहिल्यादेवींची खरी परिक्षा नियतीने घेतली।गौतमाबाई,मल्हारराव,मुलगी मुक्ताबाई व बरेच आप्तलगांचे पाठोपाठ मृत्युंनी अहिल्याराणींना पुरते खचविले होते।
अशा प्रतिकुल परिस्थितही अहिल्याराणीनी आपला संयम व प्रजेच्या काळजीखातीर कुठलेही भावनात्मक पाऊल ऊचलले नाही।कारण खुःद अहिल्याराणी 'भावनेपेक्षा कर्तृव्याला श्रेष्ठ' माणनार्या होत्या.
त्यामुळे आजच्या महिलांनी लहान सहान गोष्टीवरून चिडचिडपणा करून थेट भांडण,घटस्फोट,सासु सासरे वृद्धाश्रमा पर्यंत पोहचविण्याचे 'पराक्रम' करण्या अगोदर 'सास-बहु'चे रिमोट बाजुला करून कधीतरी अहिल्या-जिजाऊ-सावित्री वाचा।
* कर्तव्यनिष्ठ,शौर्यवान,लोककल्याणकारी ,दुरदृष्टी व्यक्तीमत्व :अहिल्याराणी होळकर।*
1766 साली मल्हाररावांच्या मृत्युनंतर राघोबा पेशवाची कर्मठ नजर अहिल्याराणीच्या राज्यावर पडली।तसे स्त्रीयांना अबला माणन्याचा पायंडा तर 'त्यांचाच' आहे।पण राघोबा पेशव्याच्या त्या कृत्यावर अहिल्याराणीने बाणेदार पणे"स्त्री म्हणुन कमजोर समजु नका,वेळेप्रसंगी खांद्यावर शस्त्र घेऊन समोर ऊभी राहीन.आणि ते दौलतीस जड जाईल कारण आमच्या पुर्वजांनी तलवार चालवुन स्वकर्तृत्वावर दौलत कमावली आहे,ती अशीच जाऊ देणार नाही.बाईचा पराभव झाला तर काही होणार नाही पण पेशव्यांचा पराभव झाला तर जगात दाखविण्यासाठी नाक राहनार नाही" ऊत्तर दिले।
ह्या प्रकारामुळेच पेशव्यांची अहिल्याराणीच्या राज्या कडे पुन्हा पाहण्याची हिंमतच झाली नाही।
खरेतर अहिल्याराणींनी अनेक लोककल्याणकारी कामे केलीत मंदीरे,धर्मशाळा,अन्नछत्रे,वृक्ष संवर्धन,विहिरी,पाण्यचे कुंड असे अनेक लोकहितकारी कार्य केलीत।
त्यांच्या कालखंडात तर झाडतोड ही अदखलपात्र गुन्हा होता।
त्यांनी नदीच्या मुख्य प्रवाहापासुन अनेक कृत्रिम प्रवाह निर्माण करून ऊजाड ठिकाणी पाणी पोहेचवुन शेतकर्यांना शेती करण्यासाठी पाणी ऊपलब्ध करून दिले।तसेच शेतकर्यांना वेळेप्रसंगी शेतसारा मध्ये योग्य ती सवलत देऊन शिवरायांच्या शेतकरी प्रती धोरणांचा अवलंबही केला होता।
आजही माहेश्वरच्या साड्या प्रसिद्ध आहेत।तेथे वस्त्र ऊद्ध्योगासाठी अहिल्याराणींनीच पुढाकार घेऊन वस्त्रोद्ध्योगास चालना दिली होती।
*न्यायप्रविष्ठ व्यवस्था*
अहिल्याराणी कायदा व सुव्यवस्थते बद्दल विशेष दक्ष असायच्या।
"राज्यातील गवताची पेंढी व पावभर तेलही कुणास आज्ञेशिवाय घेता येत नव्हते".
त्यांनी कधीच गुन्हेगारास माफ केले नाही,पण कठोर अशी शिक्षाही करण्यास त्या टाळायच्या कारण'शिक्षा ह्या सुधारणा घडविण्यासाठी असतात' असा त्यांचा कटाक्ष होता।
*तत्कालीन व्यवस्थेस लाथाडले*
खरेतर होळकर घराणे हे धनगर समाजाचे असल्यामुळे तत्कालीन काळाच्या व्यवस्थेनुसार शुद्रच होते।
आणि शुद्रास राज्यव्यवस्था निर्माण करताच येत नाही असा 'त्या' व्यवस्थेचा नियम आहे।पण अहिल्याराणीने "ज्या मनगटात बळ,बुद्धी,चातुर्य आहे।तोच स्वबळावर लोकाभिमुख राजा बनु शकतो"या विचाराच्या आधारे तत्कालीन व्यवस्थेला जबरदस्त 'चपराक' लगावली होती।
अहिल्याराणींनी सती प्रथा,बालविवाह,व विधवांसाठी विशेष योजना राबवुन अन्यायकारी व्यवस्थेस लाथाडले।
*-बहुजण क्रांतीकारक होळकर घराण्याचा ईतिहास अंधारात*
आज शिकुन शिक्षित झालेल्या बहुजम समाजासमोर खर्या क्रांतीकारकांचा खरा ईतिहास समाजासमोर आलाच नाही किंवा आणल्या गेला नाही।
मल्हारराव होळकरांच्या गौरवशाली कार्यास पानिपतच्या हारण्याचा विकृत ईतिहास जोडला,
तर शिवरायानंतर स्वबळावर स्वराज्य निर्माण करणारे एकमेव शौर्यवान महाराजा यशवंतरावांचा ईतिहास' होळकरी दंगा','पुने जाळनारा' म्हणुन विकृत केला।
त्या मध्ये बिरसा मुंडा,ऊमाजी नाईक,लहुजी वस्ताद साळवे,मल्हारराव होळकर,आद्ध्यक्रांतीकारक विठोजी होळकर,महापराक्रमि महाराजा यशवंतराजे होळकर तथा अनेक अगणित व अज्ञान बहुजण क्रांतीकारक व खरे स्वातंत्र्यविरांचा ईतिहास आजही अंधारात आहे ही शोकांतीकाच।
बहुतेक 'कॅलेंडर'मध्ये अहिल्या जयंतीची दखलही घेतल्या गेली नाही।
अहिल्या जयंती निमित्त एकच अवाहन करतो कि प्रत्येक कार्यलय,चौक,घरात अहिल्या जयंती साजरी करून या शौर्यवाण स्त्रीरत्नाच्या गौरवशाली ईतिहासाचा सन्मान राखा( महिलांकडुन विशेष अपेक्षा)
अहिल्या जयंतीच्या मनपुर्वक शुभेच्छा।।
:सौरभ गोपाळ हटकर
9604079143

Comments
Post a Comment