धनगर आरक्षण लढा:-एक चिंतन🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
महात्मा गांधीजी हे मुरलेले राजधुरंधर व्यक्तीमत्व होते.ते प्रत्येक लढा उभारायच्या वेळेस हा लढा अंतिम असून,स्वराज्य मिळविल्याशिवाय शांत बसायचे नाही असे सांगून लढा उभारायचे,,,,लढ्याला व्यापक जनस्वरूपही असायचे...पण गांधीजी काही सवलती मिळवून अचानक लढा मागे घेत असत....कारण त्यांना जनआंदोलने दिर्घ काळ टिकू शकत नाहीत ह्याची जाणिव असायची.....आंदोलन शांत झाल्यावर ते दुसरे आंदोलन सुरू करायच्या मधल्या काळात कृतीशील कार्यक्रम हाती घ्यायचे.जेणेकरून समाज संघटन सदृढ आणि लोकशाही स्विकारण्यास प्रवृत्त होईल.
पुन्हा आंदोलन पुन्हा तोच जनसैलाब पुन्हा तह पुन्हा कृतीशील कार्यक्रम ....असा गांधीबाबाचा स्वातंत्र्य लढ्यातील प्रवास ठरलेला होता.यालाच struggle-truce-struggle असंही म्हटल्या गेलं....
सांगायचा मुद्धा हा की....अनेक वर्षांपासून विशेषतः 2013-14 पासून धनगर आरक्षण लढा जोरात चालू आहे.पण मुळतः तो दोनच पातळीवर झालेला दिसून येतो.आंदोलन आणि आश्वासन. या पलिकडे या लढ्यातून काही साध्य झालं असं मला तरी वाटत नाही(ते मंत्रीपद अन पहिली खासदारकी ही स्वतः साठीची राजकीय सोय होती).
मुद्धा असा की हे असंच किती दिवस चालणार??ह्यातून काही संरचनात्मक निघणार का..?
2014 च्या पुर्वी जशी आंदोलने आणि भाषा चालायची तिच 2019 पुर्वी समाजाच्या तोंडी आहे.बदल काय झाला?तर बदल एकच झाला जो समाज 2014 दरम्यान जानकर साहेब अन महात्मे साहेब यांच्या मागे बिनदिक्कत पणे उभा राहायचा,तो समाज आता दुभंगलाय.आणि सध्य स्थितीत जो व्होल्ट जानकर साहेब अन महात्मे साहेबांनी पुर्वी निर्माण केला होता(जो की आता नाही) तसा अखिल महाराष्ट्र पातळीवर निर्माण करणारा एक पण नवा नेता धनगर समाजात नाही.(उर्वरीतांना प्रस्थापित म्हणू म्हणू समाज जून्या पण जाणत्या नेत्यांवरही विश्वास ठेवायलाही तयार होणार नाही)
यात चुक एकच झाली 2014 ते 2019 मधील काळात समाजातील सामान्यांसाठी कृतीशिल अन संरचनात्मक असे भरीव काही करताच आले नाही.संघटनही साधता आलं नाही.जे प्रश्न अन परिस्थिती आधी होती त्यात काहीच फरक पडला नाही.मेंढपाळांची स्थिती आहे तिच आहे. थोडाफार प्रयत्न महात्मे साहेबांची आरक्षण संघर्ष समिती करायचा दाखविते तर त्यात समाज संघटनापेक्षा भाजप संघटनच जास्त दिसतं.
त्यातून जिल्हा पातळीवर नियोजन समित्यांसारखी तत्सम पदं मिळविलेली दिसतात....
असो .....पण यापुढे सर्व पक्षातील धनगर समाजातील नेत्यांनी एकत्र यावे...हे जर जास्तच आदर्श वाटत असेल तर निदान त्या त्या पक्षातील धनगर नेत्यांनी एकत्र यावं...समाजाचे उदरनिर्वाहाचे प्रश्न अजेंड्यावर घेऊन सोडविण्यास नेतृत्वास भाग पाडावे....
प्रत्येक संस्थेत म्हणजे लोकसभा,राज्यसभा,विधानसभा,विधान परिषद,सर्व सहकारी संस्था आणि इतरही संस्थेंवर किती प्रतिनिधीत्व समाजाला मिळेल याचे प्रतिज्ञापत्र त्या त्या पक्षाकडुन घ्यावे....अन मग समाजात मतं मागायला यावे.....
अन्यथा धनगर समाजात स्वातंत्र्यलढ्या सारखा आधी 'राजकीय की सामाजिक' हा प्रश्न निर्माण होईल......
✍🏻सौरभ हटकर
खामगांव,बुलढाणा9604079143
Comments
Post a Comment