बौद्धिक संपन्नतेचा सूर्य आणूया ......

 बौद्धिक संपन्नतेचा सूर्य आणूया  ......
एखाद्या व्यक्तीची कल्पना,अविष्कार किंवा संशोधनाची अथवा कलाकृतीची चोरी करुन,
तिचा ऊपयोग त्याच्या परवानगी विना  स्वताःच्या फायद्यासाठी  करण्याच्या जुगाड प्रवृत्ती वर निर्बंध घालण्यासाठी तथा  मुळ मालकाच्या कल्पनेच्या हक्काचे संरक्षण करण्या करीता
भारत सरकार ने बौद्धिक संपदा धोरण जाहिर केले.
आणि  माझ्यासारख्या तरुणाला आनंदी व्हावे कि निराश  व्हावे हा प्रश्न पडला ?.
कारण आनंद या साठी कि आता कोणीही कुणाच्या कल्पना ,निर्मितीची  चोरी करून कॉपी पेस्ट करणार्या प्रवृत्ती वर प्रतिबंध येतील आणि खऱ्या संशोधकाला व त्याच्या मेहनतीला  न्याय मिळेल .त्यामुळे भारतीयांच्या कल्नाशक्तीला वाव मिळून भारत स्वयंपूर्ण विकासाच्या वाटेवर प्रगती करायला लागेल.
निराश या साठी झालो  कि अमेरिकेच्या दबाव खाली स्वीकारलेले  हे धोरण भारतीयांच्या 'जुगाड' संस्कृतीचे जागतिक स्तरावर वस्त्र हरण करणारे होते.
खरतर हे धोरण जरी चित्रपट,औषधी,पुस्तक,संशोधन व ई.गोष्टींसाठी मर्यादित असले तरी ,या धोरणा  वरून भारताच्या  बौद्धिक   विकासाच्या पातळी  बद्दल सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे .
आज जरी हे धोरण स्वीकारून भारताने मूळ  मालकाच्या  निर्मितीला व कल्पकतेला  सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला असला  ,तरी भारतात कल्पकतेला व संशोधनात्मक नव निर्मितीला खरंच किती प्रमाणित वाव आहे .हा हि एक संशोधनाचा विषय आहे.
त्याची कारणे व परिणाम सुद्धा चर्चिल्या  जाण्याची गरज भारताच्या सर्वांगीण  विकासाच्या दृष्टीने  महत्त्वाची  आहे .
त्यामुळे नुसतेच बौद्धिक संपदेचे संरक्षण करणे एवढेच कर्तव्ये नसून ,भारतात बौद्धिक संपन्नता रुजविने हि आज ची गरज  झालेली आहे. 
 तसा भारत हा प्राचीन काळा पासून व्यापार,कला,तंत्रज्ञान,शिक्षण,अध्यात्म,तत्वज्ञान व ई .अनेक क्षेत्रात प्राबल्य असणारा देश  होता .
भारताने जगाला आर्यभट सारखे गणिती व भौगोलिक तज्ञ ,गौतम बुद्धां सारखे तत्वज्ञ ,कौटिल्य सारखे अर्थतज्ञ ,
 नालंदा व तक्षशीला सारख्या तत्कालीन काळातील जगातील अति प्रगत व आधुनिक शिक्षण असलेल्या  शैक्षणिक संस्था ,आयुर्वेद आणि  पतंजली चे औषध शास्त्र,
वत्सायान चे कामशास्त्र,
बुद्धांचे जिवन जगण्याचे सम्यक तत्वज्ञान.
मसाल्याचे पदार्थ,कपडे,निळ,अत्तर यांसारख्या सुगंधी गोष्टींचा व्यापाराच्या दृष्टीने भारताचे 'सिल्क-रुट'च्या माध्यमातून निर्माण केलेले अंतराष्ट्रिय व्यापारी संबंध .
आणिक त्यावर आधारलेली भारताची स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था हे भारताच्या सर्वांगिण विकासाचे ध्योतक होते.
त्याचप्रमाणे
सिंधू संस्कृती मधील सापडलेले आधुनिक स्वरुपाच्या शहरांचे अवशेष ,बुद्धकालीन लेण्या,विविध भागातील पुरातन मंदिरे  हे उच्च प्रतीचे स्थापत्य कौशल्यांचा आणि
विविध नृत्य,साहित्य,कला हे  तत्कालिन काळातील आधुनिक  व प्रगतशील संस्कृतीचा अविष्कार असल्याचे  लक्षात येते. एवढेच नव्हे  तर जगाच्या जडणघडणीत भारताचा वाटा हा  ईतर प्रदेशांपेक्षा  कित्येक पटीने जास्त व प्रगतशीलच असल्याचे अभ्यासाअंती निदर्शनास येते.
  अर्थात सोनियाचा मंगलमय दिन उजाडणारा स्वयंपूर्ण असा माझा माझा भारत देश होता .
आज घडीला तोच सुवर्णमय भारत परकीय तंत्रज्ञानावर आधारित परावलंबी आणि   ऊदासिन झालेला  दिसतो.
दुसर्या देशाच्या उसन्या  तंत्रज्ञानावर शक्तिप्रदर्शन करणारा,मुबलक सुशिक्षितांचा पण कुशल मनुष्यबळाचा  अभाव असलेल्या बेरोजगारांचा ,स्वातंत्र्य मिळाल्या  पासून 'विकसनशील' च राहिलेला हा भारत देशाची होत असलेली कुचंबना पाहून शोकांतिका वाटायला लागते .
मग भारताच्या ऊदासिनतेची कारणे काय...?? आमची धोरणे कुठे चुकत आहेत कि प्रभावी धोरणांचाच अभाव भारतात आहे ??
अशा तत्सम प्रश्नांची ऊत्तरे शोधने,
सरकारचेच नव्हे तर
माझ्यासारख्या तरुणांची व संपूर्ण  देभबांधवांची जबाबदारी आहे.
मुळात  भारताची शिक्षण व्यवस्थाच जुनाट व कालबाह्य झाल्यासारखी  वाटायला लागली आहे.
त्या मुळेच भारतात संशोधन  व कल्पकतेबद्दल कमालीची अनास्था व दारिद्र्य  आहे.
आमची शिक्षण व्यवस्था चिकित्सक विद्यार्थी घडविण्याऐवजी 'मार्क्सवादी परीक्षार्थी' घडवत असल्यामुळे  कुशल मनुष्यबळ निर्मितीचा अभाव होत आहे.
मि अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेला विद्यार्थी  असून , आम्हाला अंतिम वर्षाचा प्रोजेक्ट हा स्वताःच्या  कल्पना शक्ती वर आधारित जुन्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करुन नवे तंत्रज्ञान निर्मिती बद्दलचा  असतो  व आम्हाला तसा तो करायचा असतो.
पण आम्ही तो तसा न करता आधीच्याच सिनियर चा प्रोजेक्ट कुठून तरी कॉपी करून सबमिट  करतो आणि अभियंता बनतो.
आता अभियंत्याचे कार्यच संशोधनात्मक नवनिर्मिती असते पण आमची कल्पना शक्तीच तितकी  प्रगत  झालेली नसल्यामुळे आम्हाला काहीतरी नवीन निर्माण करताच येत नाही .
कारण  बहुतांश  अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकविणारे प्राध्यापक हे सिनिअर पास आउट विद्यार्थी असतात . ज्यांना बाहेर जॉब मिळत नसल्या कारणाने पर्यायी स्वरूपी ते तासिके वर शिकविण्याचे काम करतात .  त्या मुळे आम्ही हि त्यांच्या सारखेच बनत जाऊन कौशल्याचा अभाव पण पदवीधर असलेले अभियंते बनतो आणि पर्यायाने  बेरोजगार होतो.
त्यामुळे रोजगार मिळत नसल्या मुळे मग कुणी सायबर कॅफे टाकून चित्रपटाच्या व गाण्याच्या CD कॉपी पेस्ट करत असतो किंवा क्लासेस अथवा त्याच महाविद्यालयात प्राध्यापक बनून पुढची पिढी ऊध्वस्त करत असतो,अथवा कुठलाच पर्याय ऊरला नाही तर मग स्पर्धा परीक्षेत ऊतरलेले दिसतो.
याला अपवाद ही असतील  पण ते तुरळकच ,
बहुसंख्खेने 'येरे माझ्या मागल्या'सारखेच आहेत.
 हे चित्र  फक्त अभियांत्रिकी क्षेत्राबद्धलच नसून  बहुतांश शैक्षणिक क्षेत्राबद्दल झालेले आहे.
म्हणून मध्यंतरी ईस्रोचे शास्त्रज्ञ भारतरत्न c.n.rao यांनी भारतातील 10,000 विद्यार्थ्यां मागे 1 विद्यार्थी वैज्ञानिक अथवा शास्त्रज्ञ बानतो असल्याची खंत व्यक्त केली होती.
त्याला कारण हि आम्ही मुक्त शिक्षण पद्धती करता करता शिक्षण   क्षेत्राचे केलेले बाजारीकरण,
आणि कोठारी आयोगाने सुचविलेल्या अर्थव्यवस्थेच्या  बजेटचा 6% टक्के भाग शिक्षिणावर खर्च करण्याच्या राजकीय ईच्छाशक्तीचा असलेला अभाव आहे.
1966 च्या कोठारी आयोगानंतर भारताला शिक्षिणपद्धतीत बदल घडविने गरजेचे वाटलेच नाही,म्हणून जगाच्या तुलनेत आमची शिक्षण  पद्धती कालबाह्य  व कमजोर असल्याचे मत अनेक अभ्यासक व्यक्त करतात.आणि
त्याचेच पर्यावसन मग भारतीय विद्यापिठांना जगाच्या अंतिम200 विद्यापिठातही स्थान न मिळण्याच्या नामुष्कीत होते.
   
मुळात
परदेशी औषधी कंपनी च्या हक्क संरक्षणा बाबतच्या दबावाखाली ,
आपण बौद्धिक संपदा धोरण आखतो .
मात्र त्याच पद्धतीच्या औषधी भारता मधे निर्माण करण्या बाबत मात्र कमालीची अनास्था दाखवितो.
का...??
तर आमची त्या प्रतीच्या औषध निर्मितीची कुवत नाही अथवा आमच्यात क्षमता आहेत पण त्यांना देशात वाव व न्याय मिळत नाही.
म्हणून कदाचित भारतातील बुद्धिमत्ता विदेशात जाऊन काम करतांना आढळून येत आहे, आणि मग त्यांच्या  'देश वापसी' साठी 'मेक ईन इंडिया ' सारखे  कार्यक्रम राबवावे लागत आहे.
एकंदरीतच सरकारने शिक्षण पद्धतीचा पाया हा जगाच्या दृष्टीने आधुनिक व बुद्धीजिवी स्वरुपाचा करुन ,
त्यातून सांप्रदायिकतेचा प्रचारा ऐवजी विज्ञानवादाचा प्रचार करणे गरजेचे आहे.
भारताचा प्राचिन ईतिहास ऊज्वल व सुवर्णच होता ,
पण त्यालाही काळाच्या मर्यादा होत्या,हे जाणून 'स्वदेशी' किंवा जुनं ते सोनं' च्या नावाखाली सगळ्याच जुन्या पद्धतीचा अवलंबन करण्याऐवजी 'गरजेच ते सोनं' पद्धत अवलंबून काळसुसंगत गोष्टीचा स्विकार करुन पुढे जाण्याची गरज आहे.
अशावेळी कट्ट्रर डावे किंवा ऊजव्या विचार सरणीचा प्रभाव मात्र शिक्षिण क्षेत्रावर पडू नये याची दक्षता घेणे हे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांनी घेणे महत्वाचे ठरेल.
तळागळातील लोकांपर्य्ंत ते शिक्षण प्रभावी रीतीने  पोहोचविने गरजेचे आहे.
 
साक्षरता वाढविण्यासोबतच  रोजगार देणे आणि शिक्षणावर आधारीत ऊद्योग व तंत्रज्ञान निर्मितीस वाव देणे,जेनेकरुन त्याचा ऊपयोग कृषि क्षेत्रापासुन संरक्षण,पर्यावरण ,आरोग्य अशा विविध क्षेत्रासाठी प्रभावीपणे  होईल.
त्यामुळे परदेशातून आयात केलेल्या माहागड्या ऊसण्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याची गरज उरनार नाही आणि पर्यायाने भारतीय  अर्थव्यवस्थेतील    मोठा खर्च  वाचून अर्थव्यवस्था   मजबुत होईल.
आणि मग खर्या अर्थाने भारतामध्ये बौद्धिक संपन्न्तेचा सूर्य झळाळेल.....
पण त्या साठी शिक्षणावरील खर्च इतरत् करण्याऐवजी  शिक्षणावरच करावागेल .आणि ती वेळ बौद्धिक समृद्धी च्या निमित्ताने आलेली असल्याची जाणिव होने गरजेची आहे....म्हणून
सुरेश भट म्हणतात
 "सूर्य केव्हाचाच अंधारला यार हो ,
चला नवा सूर्य आणू यार हो "

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .

भाकरीचा चंद्र की चंद्रावरची भाकर....??