ईतिहासातील ऊपेक्षित योद्धा:-मल्हारराव होळकर

����������������
"ईतिहासातील ऊपेक्षित योद्धा मल्हारराव होळकर।।"
~जयंती:-~~~~16  मार्च~~~~~~~
����������������

होळकर।।"

~जयंती:-~~~~16  मार्च~~~~~~~

����������������


खरंतर इतिहास हा बर्याचदा आपआपल्या सोईप्रमाणे लिहील्या जातो.कधी जाती ला पुरक तर कधी धर्माला किंवा वर्णाला किंवा स्वः  स्वार्थाला   पुरक ठरेल असा सोयीचा करून सोईस्कर पणे लिहील्या जातो. ...अशा लिखानांचा उद्धेष स्वः जातीचे/धर्माचे/वर्णाचे श्रेष्ठपण जोपासण्याकरीता व ते अबाधित ठेवण्यासाठी  किंवा बरेच   लेखक,कादंबरीकार प्रसिद्ध होण्यासाठी आपल्या कादंबरीचा  कुणालातरी'व्हिलन'ठरवावा आणि कादंबरी 'हिट' करावी. या स्वार्थी  दृष्टीने अथवा तत्कालीन काळातील पुराव्या अभावी असे लिखान करत असावेत असा  माझा अंदाज आहे.


पण अशा लिखाणामुळे झालेली वैचारिक विकृती सालोसालं समाजात पाझरत जाऊन सामाजिक विषमता निर्माण करत जाते आणि उत्तुंग कार्य करणारी आभाळी एवढ्या उंचीची व्यक्तीमत्व त्या विकृतीला बळी पडून  नाहक बदनाम होतात.अशाच विकृतीमुळे पानिपतचे 'व्हिलन' ठरून बदनाम झालेले सुभेदार मल्हारराव होळकर.


त्यांच्या वरील आरोपांचे खंडणासाठी  त्यांच्या जयंतीच्याच पर्वावर सदर लेख समर्पित....

14जाने.1761 म्हणजेच काळा दिन...व म्हटलेच तर मर्हाट्यांच्या वैधत्वाचा दिवस.या दिवसाच्या ईतिहासाचा  प्रभाव एवढा  आहे की,आजही कोणती वाईट घटना घडली की त्याचं 'पानिपत झालं' असा भितियुक्त स्वर ऊमटतो . पण दुर्दैव अस की या ईतिहासाबद्दलही बर्याच प्रमाणात  विकृत पद्धतीचे लिखान झालं.

आणि मग ज्या प्रमाने अन्य महापुरूषांच चरित्र हणन करण्यात येतं, अगदी तसेच या पानिपतच्या पराभवाच खापर ही मल्हाररावांच्या शौर्यवाण चरित्राला विकृत ठरविण्याच्या उद्धेषाने केले गेले.

इतिहासाबद्धलची अशी षडयंत्र बरीच झालीत,अगदी शिवपुत्र छत्रपती संभाजीराजेही असोत की फाळणी च्या नावाखाली चक्क देशविरोधी ठरविले गेलेले गांधीजी असोत .

पण  अनेक चिकित्सक अभ्यासकांनी तर्कशुद्ध अभ्यास करीत, खरा ईतिहास  समाजापुढे आणण्याचे व मांडण्याचे  कार्य मोठ्या प्रमाणात  सुरू केले आहे. 

म्हणून  आज मल्हाररावां बद्दलच्या गैरसमजांना दुर करूण  भावी पिढीला व आमच्या सारख्या तरूण पिढिला   

नव्याने ईतिहास समजने गरजेचे वाटते म्हणून हा लेख प्रपंच.


खरेतर मल्हाररावांवर अनेक आरोप केल्या जातात.अस म्हटल्या जाते  की, पानिपत मल्हरराव होळकरांमुळे घडले किंवा हरले.आणि त्याला प्रमुख कारणे खालील प्रमाणे दिली जातात.

1.मल्हाररावांनी नजिबास जिवंत सोडले  आणि मग पुढे नजिबानेच अब्दालीला आमंत्रण दिले.

2.मल्हाररावांचे रणमैदानातुन पलायन,म्हणुन बाजु कमी पडुन मर्हाठ्यांची हार.

मुळात या दोन्हीही गोष्टी बिनबुडाच्या आणि तथ्थहिन आहेत.

असे मी नाही म्हणत तर  ईतिहास संशोधक,विचारवंत,लेखक संजय सोनवणी त्यांच्या मुरलीधर मल्हार अत्रेंनी (विचारवंत 1893)लिखित व संजय सोनवणींनी संपादित 'सुभेदार थोरले मल्हारराव होळकर' या पुस्तकात सर्व संदर्भासहीत लिहीलेले आहे.

मुळात मुरलीधर अत्रेंनी  '1893' सालीच हे सर्व आरोप खोडले होते. पण त्यांच लिखाण दुर्दैवाने ईतिहासात गडप झाल,आणि मग ते टोरंटो विद्ध्यापिठाने प्रदर्शित केले. असे सोनवणी सांगतात....

असो पहिल्या आरोपाबद्दल लिहीतांना संजय सोनवणी पुराव्यासहीत लिहीतात,की नजिबास जिवंत सोडले तो काळ होता 1757 चा,आणि नजिबास जिवंत सोडण्यामागे मल्हाररावांचा खुप मोठा असा दुर दृष्टीकोणही होता .

तो असा कि तत्कालिन दिल्लीचा वजीर गाजीऊद्धीनने त्याचा बादशहा अहमदशहाचा विश्वासघात केला ,व कदाचित तो मरहाठ्यांना भविष्यात किंवा चालु काळात मनस्तापी ठरू शकतो .म्हणुन त्याच्यावर वचप ठेवणारा एकमेव दिल्लीतील नजिबाला मारणे हे मराठ्यांना डोकेदुखी ठरू शकणारे होते.   या दुरदृष्टीपणा व मुत्सदीपणाचं राजकारण कदाचित आम्हाला कळलेच नाही किंवा कळु दिल्या गेल नाही.

राहिली गोष्ट अब्दाल्लीला निमंत्रण देण्याबद्दल तर सोनवणी सर म्हणतात, नजिबा अगोदर भारतातुन अनेक बोलावणे अब्दालीला गेले होते.त्यामुळे फक्त नजिबास कारणीभुत धरणे म्हणजे अर्ध घेउन पळण्यासारखे.

त्याहुन महत्वाची गोष्ट अशी की नजिबास जिवंत सोडले 1757 साली आणि पानिपत घडले 1761 साली.त्यामुळे मल्हाररावांना काय स्वप्नात दृष्टांत पडणार होता, की समोर पानिपत घडणार नि त्याही समोर च्या म्हणजेच आपल्या काळात त्यांच्यावर नजिबास जिवंत ठेवल्यामुळेच पानिपत हरल्याचे आरोप होणार....  काश असे झाले असते तर मल्हाररावांनी काय केले असते? हे आपणही जाणताच.

त्यामुळे मल्हाररावांनी नजिबास सोडले म्हणुन मराठे हरले असा विकृत तथ्थ्यहिन ईतिहास प्रचलित आहे.


आरोप क्र.2 मल्हाररावांचे रणमैदानातुन पलायन.म्हणुन बाजु कमी पडुन मरहाठ्यांची हार.अहो मल्हाररावांची अख्खी जिंदगी लढाईत गेली.त्यामुळे ते लढाईतून पळाले असावेत हे मनाला नैतिकरीत्या पटत नाही. पण ईतिहास हा भावनेच्या नसून पुराव्याच्या आधारावर मांडावा लागतो.म्हणून पुढील प्रसंग लक्षात घेणे गरजेचे मल्हारराव होळकर तथा जनकोजी व दत्ताजी शिंद्यांच्या पराक्रमी फौजेने   22नोव्हे 1760 च्या रणधुमळीत  अफगाणी फौज अक्षरश:कापुनच काढली होती, तथा अब्दालीच्या छावण्या पर्यंत घुसुन अब्दाल्लीच्या नाकावर टिचुन त्यांच्या फौजेस दमछाक करून जेरीस आणले होते.

मग त्या आरोपाचे काय?   पानिपत नंतर मल्हाररावांनी ऊत्तरेत मराठ्यांच जबरदस्त  वर्चस्व निर्माण केल

असा ईतिहास सांगतो.तथा संजय सोनवणी सुद्धा लिहीतात की मल्हारराव शेवट पर्यंत रणांगणावरती होते.कारण नाना पुरंदरे संध्याकाळी 5:20च्या सुमारास  मल्हाररावांबरोबर निघाल्याचे पत्र संदर्भ आहे.तसेच भाऊंच्या पत्नी पार्वतीबाईस वाटे मधे भेटल्यामुळे त्यांनाही मल्हाररावांनी सुरक्षित सोडल्याची नोंद आहे.

त्यामुळे ते शेवटपर्यंत रणांगणावर होते.

मग आता प्रश्न असा पडतो की पानिपत कशामुळे हरलो तर आपण जरी हरलो असलो तरी  मात्र अब्दाली ने ही खुप काही जिंकले असे नाही.

पानिपत न जिंकण्यामागची प्रमुख दोन कारणे

1.चंगळवादी व्यवस्थापण.

2.प्रतिकुल परिस्थिती ,गोलाकार युद्धनिती।

13 मार्च1760 रोजीच शिंदे-होळकरांनी अब्दालीस तह करण्यास भाग पाडले होते.

पण भाऊंच्या अतिघाईमुळे व स्वतःला शुरविर सिद्ध करण्याच्या हव्यासा पोटी तह फिस्कटला ,त्याचे परिणाम लाखो मावळ्यांच्या कत्तलीने झाला.

भाऊंनी' मल्हारनिती 'नाकारून, गोलाकार युद्धनितीचा अवलंबन केल्यामुळेच मराठ्यांची लढतांना खुप दमछाक झाली.

आणि त्यामुळे मराठे लढतांना मोठ्या प्रमाणात कामी आले.

हा ईतिहास समाजातुन दडपल्या जातोय,अन मग 'मल्हार आया' अस म्हटल्यानंतर भल्याभल्याची 'पतलुन गिली 'व्हायची ईतका शौर्यवान,कर्तृत्ववान व्यक्तीमत्व असलेले मल्हारराव आजही समाजात ऊपेक्षितच राहतात..

या गोष्टीची शोकांतिका वाटायला लागते.खरतर अस म्हटल्या जात कि महापुरूषांना 'जाती व धर्म नसतात'पन मग मल्हारराव,बिरसामुंडा,ऊमाजी नाईक,यशवंतराव होळकर ,महाराणी ताराराणी अशा व अनेक जाज्वल्य पराक्रमाच्या  विरांचा ईतिहास मोठ्या प्रमाणात लिहील्याही जात नाही व सांगितल्याही जात नाही.

तेव्हा जात पाहुन महापुरूषांच्या चारित्र्याचे हवं तसं लिखान करायच.?अस जर कोणी विचार करत असेल तर मग वंचितांनीही आपला ईतिहास आपल्यालाच लिहावा लागेल या मानसिकतेतुन विचारांच्या तलवारी घासण्यासाठी तयार राहावे.

हे खरं आहे की आज विकृत लिखाणाला  ऊत आलाय पण ते लिखाण खर्या ईतिहासाला दडपु शकत नाही.

क्योकी "सत्य परेशान हो सकता है पराजित नही".आणि अपेक्षा बाळगतो की आपणही सत्याची कास धरूयात .याच मल्हाररावांच्या जयंतीनिमित्त सुभेच्छा......

⛳⛳⛳⛳����⛳⛳

जय मल्हार....

सौरभ गोपाळ हटकर।

हिवरखेड ता.खामगाव जि.बुलढाणा


��9604079143
Www.saurabhhatkar.blogspot.com
⛳⛳⛳⛳����⛳⛳
Share it����������

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

06 Dec...

म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .