माफ करा बाबासाहेब

      "माफ करा बाबासाहेब"

प्रिय आदरनिय बाबा,
...............तुम्ही 58 वर्षाअगोदर आम्हाला सोडुन गेलात.सर्व कष्टकरी आणि शोषितांचा आभारस्तंभच नव्हे तर प्रेरणेचा सुर्य 6डिसे1956 ला काळवंडला.हजारो दिनांचा,बहुजणांचा कैवारी सोडुन गेलात......
पण जी मानसं जन्माला आल्यानंतर फक्त आपल्या 'बाल्या,बाली.....अन वंशाला वाली 'निर्माण करण्यासाठी जगतात,ती 'मातीत' गेल्यावर लोकांच्या 'मती' तुन ही जातात.
पण बाबा तुमचं अवघ आयुष्यच येथील लाखो शोषितांची मती सुधरविण्यासाठी गेल.
हजारो वर्षाची गुलामगिरीला सुरूंग लावण्यात गेल म्हणुन तुम्ही देह स्वरूपान जरी गेला असाल तरी अमुल्य विचारांच्या स्मृतीत येथील प्रत्येक व्यक्तीच्या मनात व डोक्यात बसला आहात.
म्हणुन हे एक पत्र तुम्हाला लिहीतोय बाबा,
तुम्ही(स्वर्ग मि म्हणनार नाही,कारण ते थोतांड असल्याची जाणीव तुम्हीच आम्ह दिलीआहे म्हणुन)प्रत्येक मानसाच्या ह्रदयात तुम्ही आहात आणि तुमच्याच त्या अंशाला जागृत करण्यासाठी समर्पित हे एक पत्र.......
काल एका न्युज वाहिनीवर एक दृश्य पाहिल.....प्रचंड असा जनसमुदाय चैत्यभुमिवर जमला.....हजारो युवक,युवती,लहान सहान-महान पोर,माणसं,स्त्रीया,नेते,जेते सगळेच आपणास अभिवादन करण्यासाठी जमले होते.
बाबा मनाचं गोदाम आनंदाने काठोकाठ भरलं होत....
ज्या समाजासाठी तुम्ही ऐशोआरामि जिवन नाकारून हाल अपेष्टांच जगण स्विकारले तो समस्त *समाज आज एकजुटीने संघटित होऊन तुम्हास अभिवादन करीत होता.
"पण तोच बाबा एक अवचित घडले,
ज्यांच्यावर विश्वास ठेऊन तुम्ही निघुन गेलात,
त्यातील काही एकमेकात भिडले....
हे दृश्य पाहुन बाबा,
अनेकांचे अंतर्मण रडले......
प्रश्न ही खुप पडले,
कि हे अवचित कसे काय घडले.."
आणि मग बाबा तुमचे अनुयायी हा शब्द लावुन मिरवणार्या तथाकथित अनुयायांना तुम्ही किती कळले..? असा प्रश्न मला पडला.
म्हणुन हे एक पत्र थेट तुम्हास लिहिले....
येथील प्रत्येक अनुयायाच्या मनातील बाबासाहेबांना लिहीलेय........
     तुम्ही भाषनात नेहमि सांगायचेत कि "शिका,संघटित व्हा,संघर्ष करा"..पण बाबा आज आम्ही फार शिक्षित झालो(सुशिक्षित पणा बद्दल शंका आहे).
घरावर माडीवर माडी चढविली,तळ्यातील पाणी पिण्याचे विटाळ असणारा समाज आज 'बिसलेरी' च पाणी सोड्या सोबतही प्यायला लागला.
पण तुम्ही दिलेल्या अधिकाराचा वापर करूनच हे सर्व घडले याचा विसर मात्र काही प्रमानात का होईना आम्हाला पडला.कारण संघटन हा  समाजाचा कणा असतो हे तत्व तुम्ही पटवुन दिले होते.पण त्याच संघटन या शब्दाचा वापर करून ईतके तोडले कि आज दिल्ली पासुन गल्ली पर्यंत तुमच्या नावाचा वापर करून  शेकडो संघटना निघाल्यात.
प्रत्येकाचे ध्येय जरी संघटन असल्याचा भास असला तरी वेगवेगळ्या अजेंडा आणि तत्वा वर आधारित आहेत.
म्हणुनच कि काय आजचा युवक 'चळवळी शी काही घेणदेण नाही प्रत्येक जण स्वार्थच पाहतो' अशा अविर्भावातच वावरतो.
आणि मग जो संघर्ष संघटित बनुन करायचा तो संघर्ष तुमच्याच नावाच्या संघटनेत होतो.ते ही फक्त वर्चस्व गाजविण्यासाठी,दलितांचे नेते म्हणुन घेण्यासाठी, व श्रेय लाटण्यासाठी आणि असाच प्रकार चैत्यभुमिवर झाला.
हे बघुन कित्येक दिवसापासुन अनेकांच्या मनातील खदखद मि पत्राद्वारे मांडली.
    बाबा तुम्ही समाजाला नेहमि 'शासक' असल्याची जाणिव दिली होती.अगदि "मला या देशाचा पंतप्रधान तुमच्या मधील बघायचा आहे" अशी अपेक्षा ठेऊन तुम्ही आम्हाला पंतप्रधानपदाची स्वप्न बघण्यासाठीच नव्हे तर मिळविण्यासाठी कटीबद्द केले होते.त्या साठी तुम्ही R.P.I ची निर्मिती करून समाजाला 'सत्ता हि शक्ती आहे' याची जाणिव दिली होती.
पण आज गोष्ट वेगळी आहे बाबा,
आम्ही हक्क मिळविण्याऐवजी आमदारकी,खासदारकी,मंत्री पदाच्या भिकेसाठी तत्व,चळवळ ह्या गोष्टी बाजुला सारून, नको त्या पातळीवर जाऊन,हवी ती तडजोड करून स्वस्वार्थ पदरात पडण्यासाठी एकमेकांचे खेकडा प्रवृत्तीने  पाय कसे ओडुन स्वता वर कसे जाऊ याच विचारात मशगुल आहोत.
आणि मग अनेकांनी आम्हाला पुन्हा एकदा गुलामा सारखं दावणीला बांधुन ठेवलेय.फरक फक्त सामाजिक दावणी ऐवजी राजकिय दावणीचा आहे......(कारण सामाजिक गुलामगिरी तुमच्या साहित्याने केव्हाच जाळुन टाकली)
    आणि म्हणुन आजचा समाज,युवक योग्य नेतृत्वाअभावि 'जैसै असु तैसेच राहु' या विचारात आयुष्य जगत आहे.
म्हणुन म्हणतो 'माफ करा बाबासाहेब' तुम्ही आमच्या ऊज्वल भविष्यासाठी अख्ख आयुष्य खर्ची घातले.
पण आज आम्ही स्वार्थासाठी जगतोय,
स्वाभिमाण भिकेच्या मिळकती साठी झुरतोय.
म्हणुन नामदेवराव ढसाळांच्या शैलीत"हजारो अंधारी मैलांचा प्रवास आमच्या पुर्वजांनी केलाय, आता अंधारयात्री होण्याचे नाकारलेच पाहिजे,
ऊद्याचा सुर्य ऊजाडण्यासाठी एक व्हायलाच पाहिजे"
सप्रेम जयभिम
जय शिवराय.......

*समाज=सर्व शोषित वर्ग

          :-युवावक्ते सौरभ गोपाळ हटकर
          हिवरखेड ता खामगाव जि बुलढाणा9604079143

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

प्रवास अभियंता दिन to 'दीन' अभियंता-एक विश्लेषण .

06 Dec...