~~~जाणीव~~~
सगळीकडे आपापल्या गल्ली,गाव,जिल्ह
्याच्या राज्याच(जसे
लालबागचा राजा,मुंबईचा राजा,खामगावचा राजा)
आगमन धडाक्यात चालु आहे।
कुठेकुठे तर70किलो सोने450 किलो चांदीचे दाग
दागिने घालुन
आपल्या गल्ली गावाच्या राजाला घेऊन येताहेत.
सोबत ढोल ताशे ,d.j हे घेऊनही कार्यकर्त्यांची फौजच असते.
आम्हाला आमच्या देवाच,मंडळाच,गल्लीच वर्चस्व दाखविण्यासाठी आम्ही साम-दाम-दंड-भेद वापरून आमच्या गल्लीच्या मंडळाच्या राजाच खर्चिक स्वागत करतो पण देशाचा राजा मात्र नंगा होतोय
याचीही जानिव असु द्या मित्रहो.
गणेशजीचे वाहन ऊंदीर मामा त्याच शेतकरी राज्याच अन्न खातो.जर शेतकरीच मेला तर अन्न नसणार,मग ऊंदीर मामा कसे जगतिल .....?
बफे पार्टी छानच आहे जिथ प्रश्न पडतो कि काय
खाऊ नि कोणत खाऊ..?
पण 'मि' 'कुठ व कस' खाऊ प्रश्न पडणारेही या देशात बर्याच प्रमाणात
आहेत याचीही जाणिव असु द्या मित्रांनो.
आम्ही भंडारा करतो,अन्नदान करतो हरकत नाही पण बफे पार्टीच्या नावाखाली अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात होते हे ही नाकारण्या जोगी गोष्ट नाही.
गणेश महोत्सव कोणी,कशासाठी सुरू केला किंवा गणपती वैदिक कि अवैदिक संस्कृतीचे प्रतिक ह्यावर बर्याच गोष्टी लिहीता,सांगता येईल.
पण सध्याची परिस्थिती पाहता महोत्सव ऊत्सवासाठी असतात,समाजाच्या एकीसाठी असतात.
समाज म्हणजे हिंदु नाही कि मुसलमान नाही समाज म्हणजे धर्माच्या कट्टरवादी भावनेच्या  भिंती तोडुन सहकार्याची,एकीची,नेकीची भावना निर्मितीसाठी एकजुट झालेला समुहास समाज म्हणुया.  मग सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी केलेल्या महोत्सवात जाती,धर्माच्या नावाखाली दंगली घडविण्यासाठी टपुन बसलेल्या डोमकावळ्यांना मात्र योग्य 'प्रसाद' द्या.
महोत्सव कोणताही असो तो आदर व आचारांची निगा व काळजी घेण्यासाठी असतो.
पण दारू ढोसुन
धिंगाणा घालताना ज्यांच्या आदरापोटी ऊत्सव
करत आहात त्यांचे आचार भ्रष्ट तर नाही होताहेत न
याची ही जानिव असु द्या।
गणपती बसवताना व
पुजा करतांना गणपतीच्या दुर्वा 3 पानाचीच
असायला हवी,नसली तर आपल काहीतरी चुकतय येवढे सुजाण
असलेल्या मित्रांनो आरती झाल्यावर पडदा टाकुन
3 पत्ती,रमी खेळुन आपल बरेच काही चुकतय याचीही जाणीव ठेवा।
नाहीतर 'आरतीला 8 जण अन पत्त्याला60 जण' म्हटले तरी अतिशयोक्ती नको.
आपल्या महाराष्ट्रातील माळीण गाव नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनदोस्त झाले,तेव्हा आपल्या मंडळाकडुन किंवा गावाकडुन काही मदत करता येत असेल तर मस्तच त्यामुळे 'एक गाव एक गणपती' चे ऊपक्रम ही राबविता येतील.
शेवटी  मित्रांनो वर्गणीच गोळा करा।
खंडणी शक्यतो टाळा, जो जेवढ देईल स्व ईच्छेने तेच घ्या व नैसर्गिक गणपती महोत्सव साजरा करा.
बाकी पटल तरच घ्या।

:-सौरभ गोपाळ हटकरहिवरखेड.9604079143

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

06 Dec...

म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .