वटपौर्णिमेचे विश्लेषण

"थोडस विश्लेषण वटपौर्णिमेचे" आज वट सावित्री। खरेतर हजारो वर्षापासुन चालत आलेली ही प्रथा। जी स्त्रीयांना वडाच्या झाडाला पुजण्यासाठी कटीबद्द करते आणि वर्षानुवर्षे तसेच सात जन्म तोच पती मिळावा असा अट्टहास त्या पुजेच्या माध्यमातुन केल्या जातो। हे सर्वश्रुत आहे माझे एवढेच म्हणने आहे की वृक्षांची पुजा कराच कारण की तुकोबांनी "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" म्हणुन वृक्षांचे महत्व विशद केले होते । तसेच तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतुन वृक्षसंवर्धनाचा संदेश वेळोवेळी दिलाच आहे। व छत्रपती शिवराय,अहिल्याराणी होळकर यांनी ही वृक्षसंवर्धनाविषयी बरेच कार्य केलेले आहे। त्यामुळे स्त्रियांनी वटवृक्षाला गिरक्या मारण्यासोबतच एखादे वृक्ष लावुन तो वृक्ष पती जिवंत असे पर्यंत तरी मरणार नाही याची काळजी घेतली तरी वटपौर्णिमेच्या पुजेचे सार्थक होईल। त्याचा फायदा जगाला global warmingच्या जहरी सापा पासुन रक्षण्यासाठी व ozoneच्या संवर्धनासाठी होईल। ***अंधश्रद्धे बद्दल*** सात फेरे मारून सात जन्मी तोच पती मिळावा या प्रार्थने अगोदर थोडेश्या खालील गोष्टीवर विचार करून जरूर पुजा करावी। 1.पती जर pureबेवडा असला आणि दररोज घरी येऊन तुम्हास मारहाण करणारा असला तरी तुम्ही 7 जन्म हम साथ साथ है म्हणत मार खायला तयार असाल तर..... 2.ऐतोबा बनुन तुम्ही आणि तुमच्या मुलांनी कमविलेल्या मलिद्यावर स्वताचा हात साफ करणारा असेल तर।। 3.तुम्हच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या आड येऊन तुम्हास आतोनात जाच करून शोषन करनारा असेल तर..... 4.अशा अनेक गोष्टी जर तुमच्या बद्दल घडत असुनही तुम्हाला जर का 'तसाच' व 'तोच' पती सात जन्म हवा असेल तर खुशाल तुम्ही पुजा करा व मिही प्रार्थना करेल की आपली पुजा सफल होओ। *****।।।।*** पण जर तुमचा पती तुम्हाला प्रेम,सन्मान,स्वातंत्र्य देत असेल तर या एकाच जन्मात सात जन्मा ईतपत टिकेल ईतके प्रेम,सन्मान व विश्वास तुमच्या पतीपरमेश्वराला अर्पण करा। कारण कोणत्याही संकटाशी लढायचे असेल तर घरातील अर्धांगिणीच्या प्रेरणादायी व हसर्या चेहर्यावर नवर्याला यशाची शिखरे दिसतात। असे वर्णन शंभुराजेंच्या आयुष्यातील प्रतिकुल काळात शंभुराजें मध्ये संयमि वृत्ती तेजोत ठेवणार्या सतेज महाराणी येसुबाई यांच्या कार्यात दिसुन येते। ****धन्यवाद*** समोर जाऊद्या।

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

प्रवास अभियंता दिन to 'दीन' अभियंता-एक विश्लेषण .

06 Dec...