Posts

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

Image
20 nov ला सायंकाळी मला सागर टेळे या मित्राचा फोन आला. सागर हा Delhi मधे सध्या upsc ची तयारी करतोय. आमची या पूर्वी कधी भेट झाली नव्हती. एक दोन वेळेस फोन वर बोलणे झाले. पण त्याने आम्हीं मेंढपाळ समूहाच्या दृष्टिने जे कार्य करीत आहे. त्याला तो जाणून होता. म्हणूनच त्याने यवत जवळ जोगेश्वरी सिद्धनायक यांच्या जत्रेला येण्याचे निमंत्रण धाडले. मित्राची Platina घेऊन मी सकाळीच यवत च्या दिशेने निघालो.  यवत हे पुणे सोलापूर  राष्ट्रीय महामार्ग 65 वर वसलेले गाव आहे.  तसे बघितल्यास हा भाग प्रचंड संपत्ती आणि समृद्धी चा दिसतो. रस्त्याने जात असताना सगळीकडे दिसणारी हिरवळ (  शेतातील म्हणतोय) मन प्रसन्न करणारी आहे. या महामार्गावर मोठया प्रमाणात फुलांच्या नर्सरी दिसल्या.  त्या नर्सरी  मधील विविध रंग बेरंगी फुले डोळ्यांना आनंद देतात.  यवत ला पोहोचल्यावर आत मध्ये २-३. किलोमिटर वर तांबेवाडी गांव आहे. त्या गावात शिरताना सगळीकडे दिसणारे उसाचे मळे, त्या भागातील समृद्धीची साक्ष देतात. ऊस आणि त्याला अनुषंगाने असणारे कारखाने हे तेथील शेतकऱ्यांच्या संपन्नतेचे  मुख्य कारण आहे. ऊस त...

पेरकुंड

 पेरकुंड(चिपाड) ✍🏻 सौरभ हटकर  09 जून ला मी 27 वर्षाचा झालो... मग सहज आई जवळ बसून मी  माझ्या जन्माची कथा तिला विचारली.  तीने जे माझ्या जन्मा वेळी झालेलं सांगितले.... ते डोळ्यात पाणी आणि डोक्यात मुंग्या आणणारे आहे... ते फक्त माझ्या जन्माची किंवा आईची कथा असती . तर फरक पडला नसता..ती तमाम मेंढपाळ व विशेषतः मेंढपाळ स्त्री ला भोगाव्या लागणाऱ्या अनेक वनवासा पैकी  एका वनवासाची आहे....... आई म्हटली "तु पोटात व्हता तव्हा म्या गावातंच हुती.....  वाड्यावं(बिऱ्हाड किंवा तांडा) तव्हा बिजा अन दादा असायची(काकू अन काका).... कधी मी जायची" मी म्हटलं मंग माझा जन्म कोणत्या दवाखान्यात झाला.......? आई म्हणाली "तुमा सगळ्याचाच जल्म असाच घरी किंवा वाड्यावं झाला,दवाखानं-बिवाखानं अन तिथं बाळांतंणं आपल्या बायाना नव्हती माहित. अन म्हणून तुया जल्मही बाबाच्या(आजोबाच्या)खोलीत झाला."  मी कुठं तरी वाचलं होतं.....  बाळंतण होतांना शरीरातील 28-29 हाडं मोडतील एवढा त्रास होतो.  मी लगेंच आईला विचारलं "पेन किलर खायची का"?  तिला पेन किलर काय आहे.  हे आजही माहिती नाही. ...

Cultural Nationalism Of ahilyadevi holkar

Image

आंबेडकर ,अमेरिका आणि आम्ही..... (जाॕर्ज फ्लाॕईड व कोरोनाच्या निमित्ताने)

जाॕर्ज फ्लाॕइड च्या हत्ये विरोधात अमेरिकेतील श्वेत-कृष्ण वर्णीय जनता सरकार व पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर येते.... आंदोलन करत व्हाईट हाऊस पर्यंत जाते........ कोरोना पासून म...

गृहितके मोडली पाहिजेत*

(लेख जूना आहे,पण विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा  लागू पडतो. नुसता वाचू नका,समजून घ्या....) ✍🏻सौरभ हटकर. एखादा  समूह संघटित नसतो ,त्याला त्याच्या प्रश्नाची जाणिव नसते.  त्याच्या वर होणाऱ्या अत्यंत अत्याचाराला तो नियतीचाच भाग समजायला लागतो. आपले हक्क ,न्याय या बाबत तो समूह पूर्णपणे अवगत नसतोच. अशावेळी त्या समाजावर व्यवस्था अन्याय करायला लागते. या  संपूर्ण अन्यायाला   त्या   समुहाचे  शैक्षणिक ,राजकीय ,सामाजिक,आर्थिक मागासलेपणंच जबाबदार असते.  अशावेळी प्रवाहाबाहेरील  त्या समुहाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य  वेलफेयर म्हणवून घेणाऱ्या राज्य संस्थेस करावयाचे असते. परंतू,तसं करने खडतर व जोखिमीचे ठरते. कारण उपेक्षित समुहाचे सक्षमीकरण केल्यास,उद्या तो  समाज आपला वाटा मागण्यासाठी उभा राहिला तर त्या समाजाला आतापर्यंत  गृहीत धरून व्यवस्था आपल्या मांडीखाली  सतत ठेवन्याची सवय झालेल्या  प्रस्थापित  वर्गाला त्याचा धक्का  बसू शकतो.  म्हणून प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध उपेक्षित समुहात असंतोष निर्माण होऊ...

लाॕकडाऊन डायरी-1* अन्यथा..... मरण त्यांची पाऊलो पावली वाट पाहत आहे

अन्यथा.....   मरण त्यांची पाऊलो पावली वाट पाहत आहे.* मुद्धा फक्त पालघर घटने पुरता मर्यादित ठेऊन चालणार नाही. ही कदाचित भयानक सुरूवात असु शकते...... काही दिवसांपुर्वीची घटना आहे.... माझ्या गावाजवळ औरंगाबाद वरून येणारा एक ट्रक य बंद पडला...... गुजरात मधील ते व्यापारी होते. औरंगाबाद वरून पुन्हा त्यांना हिंगोली ला जायचं होतं. रस्ता चुकुन ते आले होते. त्या ट्रकचा ड्रायव्हर अन एक सोबती दोघंही मुस्लिम होते. ट्रकला धक्का मारून चालू करायची गरज होती. दोघांकडुनही तशा प्रकारे  भरलेला ट्रक चालू करणे शक्य नव्हतं.... म्हणून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या तुरळक लोकांकडे ते मदत मागंत होते. तबलिगी प्रकरणानंतर...निर्माण झालेल्या साशंकतेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जवळही कोणी जायला तयार नव्हते.... कित्येकांना हात दाखवू दाखवून थकलेल्या त्या दोघांनी ... ट्रक ला धक्का मारण्यासाठी कित्येकांना विनंतीही केली..... नुसता धक्का मारण्यासाठी 2 हजार रूपये देण्याची तयारीही त्यांनी दाखविली होती.... तरीही दिवस भर त्यांना कोणीही मदतीचा हात सुद्धा दिला नाही. कोरोनाचं भय,मुस्लिमांप्रती निर्माण केलेल्या संशयाच्या...

महादेव जानकर साहेब:- वाढदिवसा निमित्त माझ्या नजरेतून विश्लेषण.

Image
✍🏻सौरभ हटकर (टिप:- मी जानकर साहेबांचा भक्तही नाही अन विरोधक सुद्धा नाही. म्हणून पुर्ण पोष्ट वाचल्याशिवांय react व्हायची घाई करू नये) 2012-13 चं साल असावं बहूदा,मी आयुष्यात पहिल्यांदा पुण्यात C&C++ चे क्लासेस साठी गेलो होतो. नल स्टाॕप असलेल्या सिड इन्फोटेक मधे मी    तेव्हा क्लास लावला होता. उरलेल्या वेळांत थोडेफार पुणेही फिरून यायचो. तेव्हा पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्यात पहिल्यांदा हातात तलवार घेऊन,घोड्यावर स्वार या भूमिकेत अहिल्यामातेची बॕनर्स दिसलीं होती. 31 मे अहिल्यामाता जयंती निमित्ताने ती लावलेली होती. रासपच्या झेंड्याच्या रंगाचे background  त्याला असायचं. त्यावर बहुजनह्रदय सम्राट महादेव जानकर हे नाव फोटो सहित छापलेलंही दिसायचं. ते बघून पहिल्यांदा महादेव जानकर या नावा बद्धल कुतूहल निर्माण झालं होतं. वालचंद सांगली येथून अभियांत्रिकीचा Diploma ते विनालग्नाचे समाजकार्य हे कुठल्याही काळातील तरूणांसाठी आकर्षणाचे पैलू जानकरांच्या व्यक्तीमत्वात आढळले होते. मेंढपाळ असल्यामुळे जानकरांसोबत  ओळख नसतांनाही, एक अपरिचीत,विना नोंदणी कार्यकर्त्याचं नातं तयार झालं होत...