Posts

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

  महादेव जानकर यांना महायुती ने एक जागा सोडून, आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले आहे. या निमित्ताने जानकर यांचा प्रभाव संपला अशी धारणा असणाऱ्या अनेकांना, आणि ही धारणा पक्की करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप ला सुद्धा महादेव जाणकार यांनी आपले उपद्रव मुल्य दाखवून दिले आहे . वरकरणी ही एक जागा वाटत असली तरी या गोष्टीला अनेक अंग आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. यामध्ये संक्षिप्त स्वरूपात जानकर यांचा राजकीय उगम, त्यांचे उपद्रव मूल्य, त्यांचा विजनवास आणि आता त्यांचे कमबॅक या सर्व गोष्टी  समजावून घेवूयात. कांशीराम यांच्या विचारधारेने प्रभावित असलेले  जानकर जरी 2014 आधी पासून, राजकारणात सक्रिय असले. तरी 2014 ला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जानकर माहिती झाले. त्याचे कारण म्हणजे धनगर आरक्षणासाठी पेटवलेली ज्योत आणि बारामती लोकसभा मध्ये त्यांनी दिलेली जबरदस्त झुंज. 2014 मध्ये सुद्धा जानकर  यांची माढा मधून लढण्याची इच्छा असताना सुध्दा ऐनवेळी बारामती मध्ये त्यांचा मैत्रिपूर्वक गेम केला गेला. पुढे धनगर आरक्षण हा मुद्दा गौण झाला, जानकर यांना

संविधानिक नैतिकता

Image
बाबासाहेबांचे लोकशाही, संविधान या संदर्भातील एक भाषण काही दिवसांपूर्वी वाचल्याचे आठवते. कदाचित 1953 साल चे असावेत. त्यात आंबेडकर यांनी अख्खं संविधान आणि लोकशाही जणू दोन शब्दात स्पष्ट केली असावी. लोकशाही, संविधान यांचे यश, मर्यादा आणि उत्कर्ष सुद्धा त्या दोन शब्दात बाबासाहेबांनी मांडला असं मला वाटतं. ते शब्द म्हणजे constitutional morality. अर्थात 'संविधानिक नैतिकता '. अख्खी लोकशाही व्यवस्था या दोन शब्दांवर बाबासाहेबांनी उभी केल्या सारखे वाटते. संविधान कितीही श्रेष्ठ असले तरी अंमलबजावणी करणारे त्या पात्रतेचे नसले तर ते प्रभावी ठरत नाही. त्याचं कारण त्यांच्या कडे ती संविधनिक नैतिकता असेलच असे नाही.. आज देशात विविध विचार प्रवाह आहेत. त्यांचे स्थूल पने आपण डावे- उजवे- मध्यम असे वर्गीकरण करतो. पण कोणी कुठ्ल्याही बाजूचा असला तरी, सर्व बाजू संविधानाच्या आत बंदिस्त आहेत. म्हणजे तुम्ही हिंदुत्ववादी असू शकता, पण तुम्ही देशाचे संविधान उलथवून हिंदू धर्म ग्रंथाचे शासन लागू करु शकत नाही. किंवा तूम्ही इस्लाम मूलतत्ववादी असू शकता, पण म्हणून राज्य हे धार्मिक ग्रंथावर चालवू शकत नाही. जे काही अस

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

Image
20 nov ला सायंकाळी मला सागर टेळे या मित्राचा फोन आला. सागर हा Delhi मधे सध्या upsc ची तयारी करतोय. आमची या पूर्वी कधी भेट झाली नव्हती. एक दोन वेळेस फोन वर बोलणे झाले. पण त्याने आम्हीं मेंढपाळ समूहाच्या दृष्टिने जे कार्य करीत आहे. त्याला तो जाणून होता. म्हणूनच त्याने यवत जवळ जोगेश्वरी सिद्धनायक यांच्या जत्रेला येण्याचे निमंत्रण धाडले. मित्राची Platina घेऊन मी सकाळीच यवत च्या दिशेने निघालो.  यवत हे पुणे सोलापूर  राष्ट्रीय महामार्ग 65 वर वसलेले गाव आहे.  तसे बघितल्यास हा भाग प्रचंड संपत्ती आणि समृद्धी चा दिसतो. रस्त्याने जात असताना सगळीकडे दिसणारी हिरवळ (  शेतातील म्हणतोय) मन प्रसन्न करणारी आहे. या महामार्गावर मोठया प्रमाणात फुलांच्या नर्सरी दिसल्या.  त्या नर्सरी  मधील विविध रंग बेरंगी फुले डोळ्यांना आनंद देतात.  यवत ला पोहोचल्यावर आत मध्ये २-३. किलोमिटर वर तांबेवाडी गांव आहे. त्या गावात शिरताना सगळीकडे दिसणारे उसाचे मळे, त्या भागातील समृद्धीची साक्ष देतात. ऊस आणि त्याला अनुषंगाने असणारे कारखाने हे तेथील शेतकऱ्यांच्या संपन्नतेचे  मुख्य कारण आहे. ऊस तसं प्रतिष्ठेचे आणि आर्थिक उत्पन्नाचे सा

पेरकुंड

 पेरकुंड(चिपाड) ✍🏻 सौरभ हटकर  09 जून ला मी 27 वर्षाचा झालो... मग सहज आई जवळ बसून मी  माझ्या जन्माची कथा तिला विचारली.  तीने जे माझ्या जन्मा वेळी झालेलं सांगितले.... ते डोळ्यात पाणी आणि डोक्यात मुंग्या आणणारे आहे... ते फक्त माझ्या जन्माची किंवा आईची कथा असती . तर फरक पडला नसता..ती तमाम मेंढपाळ व विशेषतः मेंढपाळ स्त्री ला भोगाव्या लागणाऱ्या अनेक वनवासा पैकी  एका वनवासाची आहे....... आई म्हटली "तु पोटात व्हता तव्हा म्या गावातंच हुती.....  वाड्यावं(बिऱ्हाड किंवा तांडा) तव्हा बिजा अन दादा असायची(काकू अन काका).... कधी मी जायची" मी म्हटलं मंग माझा जन्म कोणत्या दवाखान्यात झाला.......? आई म्हणाली "तुमा सगळ्याचाच जल्म असाच घरी किंवा वाड्यावं झाला,दवाखानं-बिवाखानं अन तिथं बाळांतंणं आपल्या बायाना नव्हती माहित. अन म्हणून तुया जल्मही बाबाच्या(आजोबाच्या)खोलीत झाला."  मी कुठं तरी वाचलं होतं.....  बाळंतण होतांना शरीरातील 28-29 हाडं मोडतील एवढा त्रास होतो.  मी लगेंच आईला विचारलं "पेन किलर खायची का"?  तिला पेन किलर काय आहे.  हे आजही माहिती नाही.  "तसांच दम धरत जल्म द्या

Cultural Nationalism Of ahilyadevi holkar

Image

आंबेडकर ,अमेरिका आणि आम्ही..... (जाॕर्ज फ्लाॕईड व कोरोनाच्या निमित्ताने)

जाॕर्ज फ्लाॕइड च्या हत्ये विरोधात अमेरिकेतील श्वेत-कृष्ण वर्णीय जनता सरकार व पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर येते.... आंदोलन करत व्हाईट हाऊस पर्यंत जाते........ कोरोना पासून मृत्यू च्या  भीती पेक्षाही त्यांना, त्यांच्या मुलभूत हक्कांचे जिवंत राहणे अधिक महत्वाचं वाटतं..... कोरोना पेक्षाही वंशभेद अधिक धोकादायक वाटतो... म्हणून त्यांनी अन्याय झालेल्या व्यक्तीचा वंश न पाहता,व्यवस्थेच्या अन्याया विरोधात एकत्र आले. म्हणून अमेरिकेतील लोकशाही अधिक प्रगल्भ आहे. ती शासन व्यवस्था म्हणून नव्हे तर तेथील जनतेला व्यवस्थेच्या व अन्यही अन्याया विरोधात तिव्रतेने एकत्र आणते.... त्याचवेळी... दुसरीकडे ,आपल्या देशांत आकस्मिक लाॕकडाऊन जाहिर होतं. रस्त्यानी उपाशी  पोटी असणारी लोकं-लहान लेकरं-प्रेग्नंट स्त्रीया पायपीट करीत शेकडो किलोमिटर आपल्या गावी चालंत जात होत्या...... एक 14-15 वर्षाची ज्योती पासवान नावाची पोरगी 1200 कि.मी चा प्रवास, आपल्या बापाला घेऊन सायकल वर करते. एक दीड वर्षाच्या लहान लेकराची माय रेल्वे platform वर मृत पडलेली असते,ते लेकरू त्याच्या माय ला उठविण्यासाठी धडपड करीत आई शेजारी भ्रम

गृहितके मोडली पाहिजेत*

(लेख जूना आहे,पण विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा  लागू पडतो. नुसता वाचू नका,समजून घ्या....) ✍🏻सौरभ हटकर. एखादा  समूह संघटित नसतो ,त्याला त्याच्या प्रश्नाची जाणिव नसते.  त्याच्या वर होणाऱ्या अत्यंत अत्याचाराला तो नियतीचाच भाग समजायला लागतो. आपले हक्क ,न्याय या बाबत तो समूह पूर्णपणे अवगत नसतोच. अशावेळी त्या समाजावर व्यवस्था अन्याय करायला लागते. या  संपूर्ण अन्यायाला   त्या   समुहाचे  शैक्षणिक ,राजकीय ,सामाजिक,आर्थिक मागासलेपणंच जबाबदार असते.  अशावेळी प्रवाहाबाहेरील  त्या समुहाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य  वेलफेयर म्हणवून घेणाऱ्या राज्य संस्थेस करावयाचे असते. परंतू,तसं करने खडतर व जोखिमीचे ठरते. कारण उपेक्षित समुहाचे सक्षमीकरण केल्यास,उद्या तो  समाज आपला वाटा मागण्यासाठी उभा राहिला तर त्या समाजाला आतापर्यंत  गृहीत धरून व्यवस्था आपल्या मांडीखाली  सतत ठेवन्याची सवय झालेल्या  प्रस्थापित  वर्गाला त्याचा धक्का  बसू शकतो.  म्हणून प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध उपेक्षित समुहात असंतोष निर्माण होऊ नये व त्या असंतोषातुन उपेक्षित समुहाला आपला न्याय वाटा हक्काची जाणीव होऊ नये .   या करीता ,प्